भारतीय झाडांची व वनस्पतींची संपूर्ण माहीती व आयुर्वेदिक,औषधीय उपयोग
Tuesday, June 4, 2019
उंबर ,औदुम्बर ficus racemosa ऐक आयुर्वेदिक महावृक्ष आहे .
उंबर ,औदुम्बर ficus racemosa ऐक आयुर्वेदिक महावृक्ष . भारतात हा हिंदू देवांंचा वृक्ष आहे असे मानतात परंतु देवांना आजारातून बाहेर काढणारा वृक्ष माणसांंना तर खूपच फायद्याचा असेल ना...... बघू या तर
पिकलेले उंबर फळ
आज मी उंबर ,औदुम्बर ह्या महा वृक्षाच्या झाडाची
माहिती देत आहे.ह्याचे शास्रीय नाव ficus racemosa ,कुळ मोरेंएसी. इंग्लिश नाव -गुलर
फिग ट्रीआहे.संस्कृत नाव- हेम्दुग्ध,पवित्रक.गुजराथी नाव -उम्बरो ,उमर .हिंदी - गुल्लर
,गुलार, डेमेरा अशी अनेक नावे आहे .
भारतात व महाराष्ट्रात हा वृक्ष मोढ्या
प्रमाणात जंगलात,शेताच्या बांधावर,गड किल्यात,नदीच्या काढावर आढळतो.हा वृक्ष १५ ते
२० मीटर वाढणार ,जाड सालीचा ,मजबूत आणि मोढ्या खोडाचा व त्यात ढोली असते म्हणजे अशी जागा ज्यात पशु पक्षी
प्राणी बसतात व अंडी देतात.
हिरवे उंबर फळ
सालीला टोचले या पान तोडले किवां फांटी तोडली तर धवळा,पांढरा,चिक
या दुध निघते.हा रस खूप कामाचा असतो.जेव्हां गालफुगी होते तेव्हां हा चिक गालावर
लावतात व कागद चिटकवतात.२ते ४ दिवसात
गालफुगी बरी होते.लहान मुल हमेशा आजारी पडत असेल झुरत असेल खाल्लेलं पचत नसेल
उलटया जुलाब होतात ,अशक्तपणा आला असेल तर ह्या चिकाचा वयाप्रमाणे ५ ते १० थेंब
दुधात देतात.
दुध रस उंबर
हा वृक्ष चढतांना सालीवर पांढरा ,लोमयुक्त,गुळगुळीत
बर असते त्यामुळे हात निसटतात. साल सुद्धा खूप गुणकारी आहे .दम्याचा त्रासावर साल
उकळून प्यावी,दाढ दुखणयावर साल उकळून
पाण्याची चूळ भरावी या गुळण्या कराव्या .पायाच्या
फिसके, जखमा वर साल भुकटी करून लावतात.सालीचा काढा पिल्याने खोकला बरा होतो .पाने पिंपळा सारखी गोल असतात.लहान कोवळी लाल व
नंतर हिरवी व वाळल्यावर पिवळी होतात .पानाचे चूर्ण खाल्यावर अपचन ठीक होते .पित्ताच्या
त्रासावर कोवळ्या पानाचे चूर्ण मधाबरोबर देतात .
वाळलेली पाने
ह्या झाडाचा जास्त उपयोग त्याच्या फळाचा होतो
.फळ झुपक्याने लागतात पूर्ण खोडापासून तर शेंड्यापर्यंत फळ लागतात.समजअसा आहे कि पुण्यवान माणसाला ह्याचे फुल दिसते
परंतु हे खोटे आहे ह्याची संरचना वेगळी आहे. फुलांचे पराग कण आत मध्ये घेवून फळ
तयार होते.हिरव्या फळा मध्ये परागीभवन खूप लहान काळे कीटक त्यात तयार होतात व ते
घडवून आणतात नंतर फळ पिकते रंग बदलतो गुलाबी रंगाची फळे दिसतात हि फळे फेब्रुवारी
ते जून पर्यंत दिसतात हि फळे माकडे ,हरण,पक्षी खूप आवडीने खातात.ज्या
स्र्यीचा वांरवांर गर्भपात होतो तिने हिरव्या फळांची भाजी खाल्ली पाहिजे लवकरच
गर्भाशय कमजोरी दूर होते ते ताकतवान होऊन पुढचा गर्भ पडत नाही.जुनी जखम भरण्यासाठी
हि भाजी खावी .शरीरात कोणताही रक्त वाहणारा आजार झाला असेल तर पिकलेली फळे किवां
कच्या फळांची भाजी खाल्याने आजार लवकर दूर होतो .
गर्भ
उंबराची भाजी
लघवीतून रक्त जाने ,संडासात रक्त
पडणे ,नाकातून रक्त पडणे ,खोकल्यात रक्त पडणे ,मासिक पाळी जास्त चालणे ,अश्या सर्व
रोगावर अचूक रामबाण और्वेदिक औषध ह्याच्या वेतरीक्त दुसरे कोणतेच नाही .उंबराचे मूळापासून निघणारे पाणी पिल्याने शरीरात
शीतलता शांती मिळते.हे पाणी पौष्टिक स्तम्भक आहे.परमा ,मुत्रनलीकेचा त्रास ,गोवर
,मधुमेह वर हे पाणी गुणकारी आहे म्हणून देतात .
अशा महत्वाचे झाडात ब्रम्ह देवाचा वास असतो असे
हिंदू धर्मात मानतात .तसेच भगवान दत्तात्रय प्रभूचा हा वृक्ष प्रिय
स्वामी समर्थ
आहे .तसेच
विष्णू भगवान जेव्हां नरसिहा अवतार घेतला तेव्हा हिरण्यकश्यपुला पोट फाडून मारल्या नंतर हाताच्या बोटात विष गेले व ते सर्व
उपाय करून कमी झाले नाही म्हणून अश्विनीकुमाररांच्या सागण्यावरून उंबराच्या फळात
बोटें घातल्या नंतर आग लगेच शांत झाली.
दत्त गुरु
आदिवासी लोग जेव्हां झाडा खालून जातात तेव्हां
झाड पिकलेले असेल तर एक तरी फळ खावे नाहीतर झाडाला राग येतो असे म्हणता .म्हणजे
झाडावर त्यांचे किती प्रेम आहे हे कळते .ह्या झाडालादेवपण मिळाले असल्या मुळे ह्याला कुणी तोडत
नाही ,जाळत नाही ,मुळा सगट उपटत नाही ,श्री स्वामी समर्थ, दत्तात्रय व नवनाथ
मंदिराजवळ हा वृक्ष असतोच. झाडत देव नसून देवांनाच हे झाड उपयोगी पडलेले आहे म्हणून जेथे बाग
बगीच्यात जागा भेटेल तेथे आयुर्वेदिक उपयोगासाठी हे महत्वाचे झाड लावावे हे
सांगायचे आहे . मी संजय खैरनार अश्या २००आयुर्वेदिक उपयोगी आपल्या जवळ
आढळणाऱ्या झाडांची माहिती देत आहे. आपण सर्व माहिती वाचून दुसर्याची मदत करावी .दुसर्यांना
शेयर करावी .आपल्यालासाठी बनवलेला झाडांचा विडीयो बघायचा असेल तर खालील विडीयो बघा.मला
युटूब वर subscribe⇭ करा किवा लिंक ला क्लिक करा⇨ उम्बर⇒
No comments:
Post a Comment