काटे कोलसुंद
हि भारतात पाणथळ ,दलदल ,तांदळाच्या शेताच्या कडेला नाल्याच्या बाजूला ,बोअरवेल जवळ वाढलेली दिसते .श्रीलंका ,दक्षिण आफ्रिका म्हणजे ऊष्ण कटिबंध प्रदेशात आढळतात .महाराष्ट्रात कोकणात त्रंबक व गोवा भागात आढळते .२ ते ३ फुट वाढणारी ,काटेरी ,ताट वाढणारे ,सहा पानाचे २ मोठी ४ लहान असतात .
३ ते ४ CM लांब काटे निघतात .टोचल्यास आग होते .फुले निळ्या किंवा सफेद रंगाची असतात त्या वरून २ जातीच्या काटे कोलसुंद असते हे समजते .बिया ४ ते ८ एका कांडित असतातकाटे कोलसुंद |
ह्या वनस्पती ला जानेवारीत फुले फेब्रुवारीत,मार्च मध्ये बिया बनतात में महिन्यात बिया चुरगळून काढतात ,काटे टोचतात ,ह्या बियांना "तालीमखाना " म्हणतात .हिचे अजून बरेच नावाने ओळखतात खालील प्रमाणे
औषधीय गुणधर्म व उपयोग
मूळ शीतल ,वेद्नास्थापक ,मुत्रजनक आहे .मुळांचा काढा परमा बस्तीशोथ मध्ये देतात .किवां जाळून राख सुदधा देतात लघवी वाढते मूत्रपिंड त्यातील खडे मुतखडा म्हणतात त्यावर जबरदस्त औषध आहेबिया कामोतेजक पौष्टिक, ताकदवान ,वीर्य वर्धक आहे दुधात मिसळून देतात त्याने शरीर बलवान होते .रक्त शुद्ध करण्यासाठी पण उपयोग करतात .
तालीमखाना |
पाने
पाने हिरवी स्वच्छ धुवून त्याची भाजी करतात ती खाल्याने अतिसार ,तृषा रोग ,पित्त प्रकोप ,जलोदर म्हणजे पोटात पाणी तयार होणे ,डोळ्यांचे रोग ,कावीळ व लघवी च्या आजारावर उपयुक्त आहेत .
सांधे दुखीत पाने कुटून लावतात .खोकल्यात पाने मीठ लावून खातात .
जलोदर |
GAUT गाऊट सारख्या
आजारावर हि भाजी उरिक असिड संपवते त्यामुळे जॉईट पेन थांबतो व सूज कमी होते ,वेदना कमी होतात ,वरील प्रमाणे "गाल ब्लेदर पथरी " GALLBLADDER STONE ,पित्ताशयातील खडे काढण्या साठी हि भाजी खूप उपयोगी आहे .
भाजी बनवण्याची कृती
पालक ,मेथी ,कांद्याची जशी भाजी करतो तशीच हि करतात .धुवून कापून पाण्यात उकडून पिळून पाणी काढून टाकावे ,नंतर भांड्यात तेल गरम केल्यावर लसून ,मिरची ,जिरे,टाकून भाजी परतवावी कांदा, टमाटर टाकून अजून चांगली लागते
No comments:
Post a Comment